उस्मानाबाद -: ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची आहे, त्यांनी मुळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विहित नमुन्यात विहित शुल्कासह दिनांक 13 डिसेंबरपर्यंत मंडळ कार्यालयास अर्ज सादर करावेत, अर्जासोबत मुळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुण पडताळणीसाठी केलेले अर्ज अवैध ठरविण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करावयाची मुदत दिनांक 18 डिसेंबरपर्यंत आहे. ज्या विद्यार्थ्यांना फेब्र/मार्च-2013 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरावयाचे आहेत त्यांनी नियमित शुल्कासह गुरुवार दिनांक 13 डिसेंबरपर्यंत व विलंब शुल्कासह मंगळवार दिनांक 18 डिसेंबरपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे आवेदनपत्रे सादर करावयाची आहेत, असे लातूर विभागीय मंडळाच्या सचिवांनी कळविले आहे.
माजी सैनिकांच्या कल्याण विषयक चित्रपट पुष्पांजली दुरदर्शन, डीडी भारतीवर प्रक्षेपीत उस्मानाबाद -: माजी सैनिकांचे कल्याण या विषयावरील पुष्पांजली हा चित्रपट 7 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 9-30 वाजाता व दुपारी 4 वाजता दुरदर्शन/डीडी भारतीवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा व अवलंबिताना सूचित करण्यात येते की, या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.