उस्मानाबाद :- समाजातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, महिला व बालकांना कायद्याने दिलेले हक्क व अधिकारांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष शशीकांत कुलकर्णी यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) उस्मानाबाद व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने ग्रामीण भागातील महिला बचत गटासाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलताना केले.
या कार्यशाळेत 75 कायदासाथी, स्वयंसेवकांनी विविध कायदयाबाबत माहिती दिली. अॅड व्ही. पी. डोके, अॅड. एम. एन. कोल्हे, अॅड. उमा गंगणे, अॅड. विद्या साखरे, यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा, हंडा प्रतिबंधक कायदा, गर्भधारणा प्रसवपूर्व निदान तंत्र, गर्भलिंग निवड कायदा, महसूल कायदा आदींची माहिती दिली. अॅड. संजीवनी पाटील, अॅड,प्रसाद कुलकर्णी यांनी मोटार अपघात कायदा, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, ग्राहक संरक्षण कायदा तसेच पोटगी कायदयाची माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा दिवाणी न्यायाधिश (वरिष्ठस्तर) यांनी विधी सेवा समितीच्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकात माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी मारुती भादुले यांनी महिला बचत गटाच्या महिलांना कायदेविषय ज्ञान व्हावे, महिलांवर हेाणाऱ्या अन्याय, अत्याचाराला प्रतिबंध घालता यावा, कायदयाबाबत अज्ञान दूर व्हावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख उपस्थितांच्या हस्ते कायदासाथींना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.