नळदुर्ग -: उस्मानाबाद जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे अपुरा पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून जनतेनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पडलेल्या पावसाचे पाणी प्रत्येक थेंब न थेंब जमिनीत मुरवला पाहिजे त्यासाठी पाणी आडवा, पाणी जिरवून पाणी जमिनीत पुर्नभरण करावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शहापूर (ता. तुळजापूर) येथे शहापूर-सराटी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. रविंद्र गायकवाड हे होते.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, अविकसीत भागाचा विकास झाला पाहिजे, गावातील रस्ते चांगले झाले पाहिजे, गेल्या अनेक वर्षापासून शहापूर-सराटी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. रस्त्यासाठी ज्या शेतक-यानी जमिनी दिल्या त्यांचे कौतुक पलकमंत्री चव्हाण यांनी केले. या रस्त्यामुळे शहापूर-सराटी गावचा रस्त्याचा प्रश्न मिटणार असून या रस्त्यामुळे दळणवळणाची सोय होणार आहे. विकास कामात, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. गावाच्या विकासासाठी सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन कामासाची कामे तडीस न्यावे असे प्रतिपादन केले.
जि.प. कृषी सभापती पंडित जोकार, पं.स. सदस्य प्रकाश भोसले, पं.स.सदस्य संजय जाधव, शहापूरचे सरपंच विजय पवार, उपसरंपच सचिन गोरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देशपांडे, उपअभियंता नाईकवाडी, शाखा अभियंता आलमले, पं.स. गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे, नायब तहसिलदार राजेश जाधव, दिलीप सोमवंशी, सोसायटीचे शाहुराज जाधव, खुदावाडीचे सरपंच अप्पू स्वामी, शरणप्पा कबाडे, उपसरपंच शिवप्पा जवळगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरीष जाधव, नितीन काळे, भास्कर सुरवसे, भाऊसाहेब मोरे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पवार यांनी तर सूत्रसंचालन प्रदिप जोशी यांनी केले.