मांडवी (गुजरात) -: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा विकासाच्या मुद्द्यावर चांगलाच समाचार घेतला. गुजरातमध्ये कुठेही विकास झालेला दिसत नसल्यामुळे विकास घडवून आणल्याच्या मोदी सरकारच्या गप्पा म्हणजे वा-यावरची वरात असल्याची टीका त्यांनी केली.
दक्षिण गुजरातमधील सौराष्ट्रातील मांडवी या आदिवासीबहुल जिल्ह्यात सोनिया गांधी यांनी झंझावाती प्रचारसभा घेतली. त्यांना (मोदी आणि भाजपला) गरीब आणि सर्वसामान्य माणसाशी काहीएक घेणे-देणे नाही. त्यांना फक्त स्वत:चाच आणि काही मूठभर लोकांचाच विकास साधायचा आहे. या आदिवासी जिल्ह्यात विकास झाल्याचे लक्षण कुठेच दिसत नाही. कारण त्यांनी दिलेली विकासाची आश्वासने ही निव्वळ धूळफेक आणि खोटारडेपणा आहे, असे सोनिया म्हणाल्या. केंद्र सरकारने गुजरातला मोठा निधी दिला आहे. मात्र, तो नेमका कुठे गेला, हेच आम्हाला माहीत नाही, असे सांगत सोनियांनी गुजरातमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट संकेतही दिले.
आमचे (काँग्रेस) या भागातील लोकांशी चांगले संबंध आहेत. मात्र, स्वत:च्या स्वार्थासाठी हे संबंध दुबळे करण्याचा प्रयत्न ते (भाजप) करत आहेत; परंतु तुम्ही सर्वांनी मिळून त्यांची ही चाल ओळखली आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडला, असे सांगत आदिवासी मतदार काँग्रेसच्याच पाठीशी असल्याचा आवर्जून उल्लेख सोनियांनी केला. सोनियांनी आक्रमकपणे नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले.
बापूंच्या जन्मभूमीत लबाड्या - महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची ही भूमी आहे. ते जे बोलले तसेच वागले. आता काही लोक मोठमोठी आश्वासने देतात, मात्र त्याची अंमलबजावणी करत नाहीत, नुसत्या लबाड्या सुरू आहेत, असे नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता सोनिया म्हणाल्या.