नवी दिल्ली -:  सुषमा स्वराज या पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे प्रशस्तिपत्र भाजपच्या एखाद्या नेत्याने नव्हे, तर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी दिले आहे.  अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपमध्ये सुषमा स्वराज हेच एकमेव नाव असे आहे, जे पंतप्रधान म्हणून इतर पक्षांनाही स्वीकारार्ह असू शकते.
      ब्रिटनमध्ये विरोधी पक्षनेत्याला ‘शॅडो प्राइम मिनिस्टर’ म्हणून ओळखले जाते. तशाच अर्थाने सुषमा स्वराज या  ‘शॅडो प्राइम मिनिस्टर’ आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदासाठी कुण्या दुस-याचे नाव सांगितल्याने आपल्याला त्याचे आश्चर्य वाटले, असे दिग्विजय यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी सुषमा स्वराज यानी एका जाहीर सभेत बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत ते पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले होते.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top