नळदुर्ग -: येथील हुतात्मा बाबुराव बोरगावकर उद्यानामध्ये मंगळवार दि. 4 डिसेंबर रोजी नगरपालिकेच्यावतीने महिला बचत गटाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त बचतगटाना कर्ज व फिरता निधी वितरण करणे, विविध उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तींचा सत्कार व रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.
नळदुर्ग नगरपालिकेच्यावतीने दि. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता येथील हुतात्मा स्मारकात महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पालकमंत्र्याच्या हस्ते बचत गटांना कर्ज व फिरता निधी वितरीत करणे तसेच शहरात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तींचा सत्कार, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल प्रमाणपत्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती सौ. मनीषा पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी नगराध्यक्ष शहबाज काझी, मुख्याधिकारी राजेश जाधव, सार्वजनिक बांधकाम सभापती देविदास राठोड, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. मंगल सुरवसे, पाणीपुरवठा सभापती सौ. मुन्वर सूलताना कुरेशी, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती सुफिया कुरेशी यांच्यासह नगरसेवकानी केले आहे.