नागपूर :- ज्येष्ठ क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, भारतीय क्रिकेटचे महर्षी आणि आद्य विक्रमवीर आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
           उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, भाऊसाहेबांची प्रथम श्रेणी  क्रिकेटमधील नाबाद 443 धावांची विक्रमी खेळी ही आपल्या खेळीपेक्षा सरस असल्याची कबूली खुद्द सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी दिली होती, यातूनचं क्रिकेटमधली भाऊसाहेबांची महानता सिद्ध होते. 25 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी भारतीय क्रिकेट रसिकांना मनमुराद आनंद मिळवून दिला, तसंच भारतीय क्रिकेटचा आणि महाराष्ट्राचा  लौकिक वाढवला. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचे आणि महाराष्ट्राच्या क्रीडा जगताचे फार मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
 
Top