नागपूर -: राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन उद्या बुधवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता विधानपरिषद सभागृह, विधान भवन, नागपूर येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. हे अभ्यासवर्ग 12 ते 19 डिसेंबर, 2012 पर्यंत असून त्यात संसदीय कार्यप्रणालीशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत ही व्याख्याने होणार आहेत.
महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या स्थापनेपासून (सन 1952) शाखेतर्फे संसदीय लोकशाही शासन प्रणालीच्या बळकटीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. अशा विविध उपक्रमांपैकीच एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे नागपूर अधिवेशन कालावधीत "राज्यशास्त्र" व "लोकप्रशासन" विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना लोकशाहीचे प्रत्यक्ष शिक्षण देणाऱ्या संसदीय अभ्यासवर्गाचे सन 1964 पासून आयोजन केले जात आहे.