उस्मानाबाद :- ग्रामपातळीवर शासकीय योजना पोहोचविण्याच्यादृष्टीने ग्रामसंवाद कार्यशाळा उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी केले. विविध विकास कामे केवळ योग्य व्यवस्थापन व सुयोग्य नियेाजन आणि सहभागातूनच साध्य होवू शकतात.त्यासाठी अशा कार्यशाळांची गरज असून सध्या जिल्ह्याला भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा सुसंवाद गरजेचा आहे असे त्यांनी सांगितले.
येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आज रायगड फंक्शन हॉल येथे एकात्मिक प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत कृषी सहायक,आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच महिला बचत गट प्रतिनिधीं यांच्यासाठी ग्रामसंवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन डॉ. नागरगोजे यांच्या हस्ते उपस्थितांना पाणी बचत व पाणी वापराबाबत शपथीचे वाचन करुन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी एस.डी. पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे म्हणाले की, ग्रामस्तरावर काम करणाऱ्या कृषी सहायक,आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच महिला बचत गट प्रतिनिधींना इतर विभागांच्या योजना समजावून सांगणे हा चांगला उपक्रम आहे. याव्दारे गावातील नागरीकांना या घटकांव्दारे योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल. योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात प्रसार माध्यमांचा महत्वपूर्ण सहभाग असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ.नागरगोजे यांनी जिल्ह्यातील सध्या भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नाचाही आढावा घेतला. सध्या उपलब्ध असणारे पाण्याचे स्त्रोत बहुतांशी ठिकाणी आटले आहेत.अशावेळी पाणीपुरवठा हा महत्वाचा विषय आहे. आपल्या माध्यमातून त्याची जाणीव सर्वसामान्य नागरीकांना करुन देणे हे गरजेचे आहे. गाव पातळीवर पाण्याचे व्यवस्थापन व त्याचा ताळेबंद गरजेचा असून आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेता सर्वांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आजही अनेक ठिकाणी प्रवाही सिंचन पध्दतीने शेतीला पाणी दिले जाते हे प्रकार दुर्देवी आहेत. अति पाणी लागणारी पिके शेतकऱ्यांनी घेणे टाळावे अथवा ठिबक व तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी 367 कृषी मित्रांना लोकराज्य वर्गणीदार करण्याबाबतचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांच्या हस्ते जिल्हा माहिती अधिकारी श्री. चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी योजना समजावून सांगण्याचा हा उद्देश चांगला असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी कृषी विभागाच्या महत्वाच्या योजनांची सादरीकरणासह माहिती दिली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. आर.चंदेल यांनी पशु संवर्धन विभागाच्या महत्वाच्या योजना उपस्थितांना समजावून सांगितल्या. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी खुशाल गायकवाड यांनी दिली. निर्मल भारत अभियान तसेच ग्राम विकास अभियानाबाबत डॉ. चंदेल आणि संवादतज्ज्ञ रमाकांत गायकवाड यांनी माहिती दिली. बालसंगोपन व घ्यावयाची काळजी याबाबत एकात्मिक बालविकास कार्यक्रमाची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या महत्वाच्या योजनांची माहिती सहायक प्रकल्प अधिकारी एस. टी. राठोड यांनी दिली.
कार्यक्रमाचा समारोप अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे यांच्या उपस्थितीत झाला. श्री. भांगे यांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.हाश्मी, तालुका कृषी अधिकारी एस.पी. जाधव यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक माळगे यांनी केले तर अर्जून परदेशी यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर शेळके, मकरंद नातू,आयुब पठाण, नरहरी गुट्टे, सिध्देश्वर कोंपल्ले, तानाजी सुरवसे, अनिल वाघमारे, अशोक सुरडकर, शशिकांत पवार आणि चित्रा घोडके या जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.