तुळजापूर -: कुरनूर मध्यम (बोरी धरण) प्रकल्पातील पाण्याचे नियोजन व समन्वयासाठी तुळजापूर नगरपालिकेत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई गंगणे, नळदुर्गचे नगराध्यक्ष शाहबाज काझी, न.प.मुख्याधिकारी संतोष जिरगे, नळदुर्ग न.प.चे मुख्याधिकारी राजेश जाधव, गटविकास अधिकारी कु.तृप्ती ढेरे, पाणी पुरवठा अभियंता अशोक सनमले यांची उपस्थिती होती.
नळदुर्गच्या बोरी धरणात पाण्याचा मृत साठा असून हे पाणी जास्तीत जास्त दिवस जाण्यासाठी तुळजापूर, नळदुर्ग, अणदूर या भागात सध्या एक दिवसाआड पाणी चालू आहे. जास्त दिवस पाणी जावे म्हणून दि. १७ डिसेंबर पासून आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी पाणी पुरवठा होईल. शहरवासियांनी अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा मृत साठ्यातील पाणी असल्याने पाणी उकळून व गाळून पाणी प्यावे. तरी नागरीकंनी प्रशासनास सहकार्य करावे. या बैठकीस नगरसेवक पंडित जगदाळे, गणेश कदम, श्रीकृष्ण सुर्यवंशी तसेच न.प.चे पाणी पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.