तुळजापूर -: जलसंपदा विभागाच्या सिंचन श्‍वेतपत्रिकेत कृष्णा खोरे अंतर्गत जिल्ह्याला मिळणार्‍या हक्काच्या २५ टीएमसी पाणी योजना निधीअभावी बंद करण्याचा प्रस्ताव आहे. याच्या निषेधार्थ विविध पक्ष, संघटनांच्या वतीने मंगळवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे अर्धातास सोलापूर, उस्मानाबाद, नळदुर्ग व लातूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
       बसस्थानक चौकात झालेल्या या आंदोलनात भाजपा,सेना, शेकाप, मनसे, रिपाइं, भारीप तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांचा समावेश होता. यामध्ये
पंकज शहाणे, अजय साळुंके, शिवाजी डावकरे, नागेश नाईक, बाळा शामराज, भाई उत्तम अमृतराव, तानाजी कदम, विकास मलबा, दादा हिरोळीकर, उमेश गवते, गिरीष देवळालकर, अँड. उदय भोसले, शाम पवार, बापूसाहेब नाईकवाडी, सचिन कांबळे, कालिदास नाईकवाडी, शुभम कदम, प्रमोद परमेश्‍वर,बाळासाहेब भोसले, सुनिल घाडगे, आदींचा समावेश होता.
 
Top