नळदुर्ग -: शहराच्‍या बाहेर राष्‍ट्रीय महामार्गालगत कत्‍तलखाना असूनही शहरातील गल्‍ली-बोळामध्‍ये खुलेआम जनावरांची कत्‍तल मोठ्याप्रमाणावर होत असल्‍याने दुर्गंधी पसरली असून जनतेच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याप्रकरणी शिवसेनेच्‍यावतीने संबंधिताना निवेदन देऊन तात्‍काळ बंदोबस्‍त करण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे.
       शहरामध्‍ये वाजवीपेक्षा जास्‍त जनावरे कापले जात असून गावात कसाई लोक जनावराच्‍या मासाचे व्‍यापार करीत आहेत. प्रचंड प्रमाणात जनावरे कापले जात असल्‍यामुळे त्‍यांची दुर्गंधी संपूर्ण नळदुर्ग शहरात पसरत आहे. कारण ते लोक कत्‍तलखाना सोडून गल्‍ली-बोळामध्‍ये उघडपणे जनावरे कापत असून त्‍यांचे लायसन्‍स नसतानाही उघडयावर कापत असतात. त्‍यामुळे जनतेचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे. तरी नगरपालिकेने योग्‍य ती कायदेशीर कार्यवाही करून शहरामध्‍ये मुस्‍लीम बांधवास जेवढे मास लागते तेवढेच जनावरे कापले जावे. गावात मोकाट जनावरानी उच्‍छाद मांडला असून यामुळे सर्वसामान्‍य जनतेस खूप त्रास होत असून नगरपालिकेने चार दिवसाच्‍या आत वरील बाबीचा बंदोबस्‍त नाही केल्‍यास शिवसेनेच्‍यावतीने या विरोधात तीव्र आंदोलन करण्‍याचा इशारा दिला आहे. निवेदनावर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, मुस्‍लीम क्रांती सेनेचे अध्‍यक्ष खयुम कुरेशी, शिवसैनिक ज्ञानेश्‍वर घोडके, शाम कनकधर, शिवाजी धुमाळ यांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत. निवेदनाची प्रत उस्‍मानाबाद जिल्‍हाधिकारी, तुळजापूर तहसिलदार, नगरपालिका नळदुर्ग यांना देण्‍यात आली आहे.
 
Top