नळदुर्ग -: माकणी (ता. लोहारा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या महापरिनिर्वान दिनानिमित्‍ताने येथील मुख्‍य चौकात लावले्ले डॉ. आंबेडकर यांचे कटआऊट अज्ञात इसमाने फाडून विटंबना केल्‍याचा प्रकार हा निंदनिय असून रिपाइंच्‍याच्‍यावतीने जाहीर तीव्र निषेध करण्‍यात येत असून संबंधित अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्‍याच्‍यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्‍यात आली आहे.
    दि. 6 डिसेंबर रोजी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 56 वा महापरिनिर्वान दिनानिमित्‍ताने त्‍यांना अभिवादन करण्‍याच्‍या आशयाचे कटआऊट उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील माकणी (ता. लोहारा) येथे लावण्‍यात आले होते. सदर कटआऊट काही अज्ञात इसमाने ब्‍लेडसारख्‍या धारधार शस्‍त्राने फाडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवमान केला आहे. सदर प्रकार कळताच रिपाइंचे जिल्‍हाध्‍यक्ष राजाभाऊ ओव्‍हाळ, जिल्‍हा सरचिटणीस तानाजी कदम, युवा आघाडीचे जिल्‍हाध्‍यक्ष रणजित मस्‍के, जि.प. सदस्‍य हरीष डावरे, कैलास शिंदे, रणजित रोकडे, रिपाइं लोहारा तालुकाध्‍यक्ष दिगंबर कांबळे आदीनी घटनास्‍थळी भेट देऊन गावात शांतता व सुव्‍यवस्‍था राखून सामाजिक सलोखा ठेवण्‍याचे आवाहन केले.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कटआऊट फाडून आवमान करणे हा प्रकार अत्‍यंत निंदनिय असून रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड,‍ जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, युवा आघाडी तालुकाध्‍यक्ष अरूण लोखंडे, रिपाइं तुळजापूर शहराध्‍यक्ष अरूण कदम, नळदुर्ग शहराध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्‍यक्ष शुभम यांच्‍यासह कार्यकर्त्‍यांनी तीव्र निषेध केला आहे.
 
Top