नळदुर्ग -: दिवसेंदिवस पाणी प्रश्न गंभीर होत चालला असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व आवश्यक तितकेच वापर करण्याबरोबरच आंघोळीसाठी वापरलेल्या पाण्याचा पुनरवापर करण्याचाही प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी नळदुर्ग येथील नगरपालिकेच्या आयोजित केलेल्या महिला मेळाव्याचे कार्यक्रमात सांगितले.
पाणी ही एक नैसर्गिक संपत्ती आहे. पाणी हे गटारात किंवा शौचालयात टाकण्यासाठी नाही. पाणी हे कधीच शिळे होत नसते पाणी हे अनमोल आहे, पाणी हे कधी निर्माण करता येत नाही म्हणून पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. आज सर्वत्र तीव्र पाणीटंचाई आहे. मात्र नळदुर्ग शहरातील नागरिकांना अद्याप पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र येणा-या काही दिवसात नळदुर्गकरांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. कारण बोरी धरणातील पाणी कुठल्याही क्षणी संपण्याचा शक्यता आहे. शहरात सध्या ज्या विंधन विहिरीना पाणी आहे. ते पाणी देखील कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण गेली दोन-तीन वर्षे पर्जन्यमान कमी झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे नळदुर्गकरांनी वेळीच सावध होवून आहे ते पाणी काटकसरीने व जपून वापरण्याचा आतापासूनच प्रयत्न करावा. आज नळदुर्ग शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. कारण शहरात एकाही नळाला मग ते सार्वजनिक असो की खाजगी त्याला तोटी नाही. पाणी भरण्याचे झाल्यानंतर नागरिक नळ बंद न करता तसेच चालू नळ गटारीत सोडून देतात. काही ठिकाणी नगरपालिकेने पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. या टाकीत पाणी भरल्यानंतर संबंधित न.पा. चा कर्मचारी पाणी बंद करीत नसल्याने नेहमीच टाकी भरून पाणी गटारीत वाहत असते. अशा प्रकारामुळे सध्या शहरात पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. नगराध्यक्ष नितीन कासार, प्रभारी नगराध्यक्ष शहेबाज काझी, न.प. चे मुख्याधिकारी राजेश जाधव यांनी अनेकदा नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच प्रत्येक नळधारकांनी आपल्या नळाला तोटी बसवून घेण्याचे आवाहन केले. मात्र नागरिकांनी त्याकडे अद्यापही दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे न.पा. ने आता सक्तीने कारवाई करुन शहरातील प्रत्येक नळाला तोटी बसविणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या नळाला तोटी नाही ते नळ कनेक्शनच न.पा. ने रद्द करण्याची कारवाई करावी. उस्मानाबाद, उमरगा यासह ग्रामीण भागातील नागरिकांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशी वेळ येऊ नये, यासाठी नळदुर्गकरांनी वेळीच सावध होऊन जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी केलेल्या आवाहनानुसार पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
जिल्हाधिका-यांनी बोलताना सांगितले की, शक्य असेल तेथे पाण्याचा पुनरवापर करा, यासाठी आपण आंघोळ केलेले अथवा कपडे धुण्यासाठी वापरलेले पाणी टबमध्ये साठवून या पाण्याचा शौचालयात वापर करावा, यामुळेही पाण्याची मोठी बचत होऊ शकते. बोरी धरणातील पाणी संपल्यानंतर न.पा. ने मागणी केल्यास आम्ही पाहीजे तेवढे टँकरे उपलब्ध करुन देऊ. मात्र कुठेच परिसरात पाणी उपलब्ध नसल्याने त्या टँकरमध्ये पाणी भरणार कुठून असा प्रश्नही जिल्हाधिकारी यांनी उपस्थित केले.