नळदुर्ग -: गुजरातमध्ये सलग तीन वेळा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सत्तेवर आल्याने अणदूर (ता. तुळजापुर) भाजपा शाखेच्यावतीने आनंदोत्सव साजरा केला गुरूवारी दुपारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून ग्रामदैवत श्री खंडोबाला श्रीफळ वाढवून व वाद्याच्या गजरात साखर वाटप केली. नरेंद्र मोदी आगे बढो, या घोषणा देण्यात आल्या. अण्णा चौकात याचा समारोप करण्यात येऊन मोदीनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाला समोर ठेवून तेथील जनतेनी कौल दिल्याचा मत पं.स. सदस्य साहेबराव घुगे यानी व्यक्त केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष राजेश देवसिंगकर, शहराध्यक्ष गुंडेशा गोवे, सरचिटणीस शाहुराज मोकाशे, महावीर कंदले, बालाजी पुजारी, विलास येडके, सोमनाथ लंगडे, नागनाथ मोकाशे, शिवानंद बोंगरगे, शिवाजी चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.