नवी दिल्ली -: कॉंग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी भाजपच्या खासदार स्मृति इराणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन चांगलेच वादात अडकले आहे. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीवर गुजरात निवडणुकीच्या चर्चेदरम्यान इराणी यांचा 'ठुमके लावणा-या' असा उल्लेख केल्यामुळे निरुपम यांच्याविरोधात सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
वृत्तवाहिनीवर काल गुजरात निवडणुकीवर चर्चा होती. त्यावेळी निरुपम आणि इराणी यांच्यात वाद झाला. त्यादरम्यान निरुपम यांनी इराणी यांना म्हटले होते की, 'तुम्ही पैशासाठी ठुमके लावायच्या. आज निवडणूक विश्लेषक बनल्या आहात.' या वक्तव्यावरुन इराणी चांगल्याच भडकल्या. त्यांनी निरुपम यांना नोटीस पाठविली आहे. निरुपम यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे इराणी यांनी सांगितले.
निरुपम यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. फेसबूक आणि ट्विटरवरुन निरुपम यांच्यावर टीका सुरु झाली आहे. भाजपचे प्रवक्ता रविशंकर प्रसाद यासंदर्भात म्हणाले, निरूपम यांनी मर्यादा ओलांडून महिलेबाबत अपमानास्पद टीप्पणी केली आहे. भाजपकडून त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतो. ते कॉंग्रेसचे खासदार आहेत. त्याच्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत. आम्ही सोनिया गांधी यांना यासंदर्भात मत मांडण्याचे आवाहन करुन त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करतो.
निरुपम यांच्या वक्तव्यानंतर विविध क्षेत्रातील सेलिब्रिटीजनी ट्विटरवरुन निरुपम यांच्यावर टीका केली. अभिनेत्री पायल रोहतगीने ट्विट केले, 'तुम्ही तर पैशासाठी बिग बॉसमध्ये आले होते. पहिल्याच आठवड्यात तुम्हाला लाथ मारुन हाकलले होते.'

संघ परिवाराने ट्विट केल की, संजय निरुपम यांचे घाणेरड्या वक्तव्यातून कॉंग्रेसची मानसिकता दिसते.
प्रितीश नंदी यांनी ट्विट केले, 'यापेक्षा आणखी काही वाईट होत नाही, तोपर्यंत हे सर्वात वाईट आहे.'
एकाने ट्विट केले की, संजय निरुपम यांच्यासारखे खासदार महिलांबद्दल अशा प्रकारचे वाईट वक्तव्य देतात. त्याच्या मतदारसंघातील लोकांकडून काय अपेक्षा करावी.
सौजन्य दिव्यमराठी