पुणे -: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने सृजनशीलता आणि माणूसकीचा उत्तम नमूना सादर केला. काल इग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात मिळालेला सामनावीर पुरस्कार त्याने दिल्लीतील सामुहिक बलात्कार पीडित तरुणीला अर्पण केला. सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्याने याप्रकरणी भावना व्यक्त केल्या.
युवराज सिंगने काल 3 बळी घेतले. तसेच 38 धावांची आक्रमक आणि महत्त्वाची खेळी केली. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तो म्हणाला, दिल्लीतील सामुहिक बलात्कार पीडित तरुणीला मी सामनावीर पुरस्कार अर्पण करीत आहे. तिची सध्या काय अवस्था आहे, हे मला माहिती नाही. परंतु, या घटनेने मी अतिशय व्यथित झालो आहे. जे घडले ते धक्कादायक आहे. मी आणि संपूर्ण संघ याप्रकरणी संवेदनशील आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो.
यापूर्वी मनोज तिवारी याने चेन्नईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे सामन्यात मिळालेला सामनावीराचा पुरस्कार कोलकात्यात रुग्णालयाला लागलेल्या आगीतील पीडितांना अर्पण केला होता.
* सौजन्य दिव्यमराठी