नळदुर्ग : तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, नेरुळ नवी मुंबई यांच्यावतीने नळदुर्ग येथील हुतात्मा स्मारकामध्ये शनिवार दि. 15 डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात ह्दयरोग, मधूमेह, रक्तदाब, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, पोटाचे विकार, बालरोग आदी आजारावर तज्ञ डॉक्टराकडून तपासणी करून सल्ला व औषधे देण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये पाचशे लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. ज्या रूग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रूग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. त्यासाठी शस्त्रक्रियेची तारीख व ठिकाण (उदा. तेरणा सह्याद्री स्पेशॅलिटी हॉस्टील, नेरुळ किंवा संस्थेने ठरविलेला उस्मानाबाद, सोलापूर, बार्शी, उदगीर येथी रूग्णालयात) संबंधित रूग्णाला कळविण्यात येईल. तरी नळदुर्ग व परिसरातील गरजू रूग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रशांत कोल्हे, विश्वस्त अमरसिंह देशमुख यांनी पत्रकाद्वारे केले आहे.