नवी दिल्‍ली -: दिल्‍लीत सामुहिक बलात्कारावरुन दिल्‍लीत तीव्र निदर्शने सुरु आहेत. सुमारे 7 तासांपासून हजारो निदर्शक राष्‍ट्रपती भवनासमोर राजपथवर निदर्शने करीत आहेत. निदर्शकांनी राष्‍ट्रपती भवनापर्यंत मार्च काढून आरोपींना फाशी देण्‍याची मागणी केली. परंतु, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून निदर्शकांनी सुरक्षा कवच तोडून राष्‍ट्रपती भवनाच अतिशय जवळपर्यंत धडक मारली. त्‍यामुळे पोलिसांनी पाण्‍याचा फवारे मारले आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडले. तरीही निदर्शकांनी माघार घेतली नाही. अखेर राष्‍ट्रपतींनी 5 जणांच्‍या शिष्‍टमंडळाशी भेटण्‍यास मंजूरी दिली.
       दिल्‍ली गँगरेपप्रकरणी दिल्‍ल्‍ीमध्‍ये प्रचंड जनक्षोभ उसळल्‍यानंतर सरकार हादरले आहे. आज दुपारी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्‍यांना एकूण परिस्थितीची सविस्‍तर माहिती दिली. अशा प्रकारचा घटना रोखण्‍यासाठी उपाययोजना करण्‍याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. तर दुसरीकडे सरकार दोषींना फाशी देण्‍याच्‍या शिक्षेचा विचार करु शकते, असे संकेत गृहराज्‍यमंत्री आरपीएन सिंग यांनी दिले आहेत.

 
Top