नागपूर -:  राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आज विधानपरिषदेत व विधानसभेत वंदे मातरम्‌ने शुभारंभ झाला. विधानपरिषदेत सभापती शिवाजीराव देशमुख, उपसभापती वसंत डावखरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.
त्यानंतर संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सभागृहास परिचय करुन दिला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषद सभागृहाचे नेते म्हणून नियुक्ती व्हावी, याविषयीचे पत्र सभापती शिवाजीराव देशमुख यांना सादर केले आहे. त्यानुसार सभापती श्री.देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषद सभागृहाचे नेते म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली.
 विधानसभेत अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपाध्यक्ष वसंत पुरके, गृहमंत्री आर.आर.पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आदीसह सदस्य उपस्थित होते.

* दिवंगत नेत्यांना विधानपरिषदेत आदरांजली
नागपूर -: भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, राज्याचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, विधानसभा सदस्य व माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विधानपरिषदेचे माजी सदस्य विठ्ठलराव दिकोंडा, कन्हैयालाल गिडवाणी व सदाशिवराव शिंदे यांच्या निधनाबद्दल आज विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नेत्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडून आपल्या शोक भावना व्यक्त केल्या व आदरांजली वाहिली
सभापती शिवाजीराव देशमुख, उपसभापती वसंत डावखरे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, राज्यमंत्री भास्कर जाधव, विधानपरिषद सदस्य माणिकराव ठाकरे, दिवाकर रावते, रामदास कदम, पांडुरंग फुंडकर, जयंत पाटील, किरण पावसकर, सुरेश नवले आदींनी दिवंगत सदस्यांप्रती आपल्या शोक भावना व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली. 


माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष,
शिवसेनाप्रमुखांसह दिवंगत नेत्यांना विधानसभेत आदरांजली

  नागपूर -: माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, शंकरराव जगताप, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मंत्री प्रभाकर कुंटे, शंकरराव काळे, दिग्विजय खानविलकर, मदनराव पिसाळ, लक्ष्मणराव हातणकर, वसंत होशींग तसेच माजी विधानसभा सदस्य केशवराव पाटील, ओंकार नारायण वाघ, दुलाजी पाटील, जनार्दन वळवी, दामोजी तारणेकर, महादू बरोरा, माधव मराठे, शिवाजीराव पाटील, भगवंतराव गायकवाड, भगवतीप्रसाद पांडे, रामचंद्र भोये, नरसिंगराव देशमुख व काकासाहेब देसाई या दिवंगतांना विधानसभेत आदरांजली वाहण्यात आली.
सभागृहनेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या नेत्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला त्यावर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपाध्यक्ष वसंत पुरके, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, पदुम मंत्री मधुकरराव चव्हाण, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,  संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, सदस्य सर्वश्री सुभाष देसाई, गणपतराव देशमुख, बाळा नांदगावकर, शिवाजीराव निलंगेकर, सुधीर मुनगंटीवार, मधुकरराव पिचड, वैजनाथ शिंदे, रवींद्र वायकर, बच्चू कडू, श्‍ाशिकांत शिंदे, चंद्रदीप नरके, आशीष जयस्वाल, बसवराज पाटील, पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, के.पी.पाटील, मधू चव्हाण, संजय शिरसाठ, सुधाकर भालेराव, विजयराज शिंदे, विनोद घोसाळकर, शिशीर शिंदे, अशोक जाधव आदींनी आपल्या शोक भावना व्यक्त करुन या दिवंगतांना आदरांजली वाहिली.
 
Top