सोलापूर :- महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे दि. 29 डिसेंबर 2012 रोजीच्या संभाव्य सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असुन त्यांच्या या दौ-याबाबतची पुर्वतयारी आढावा बैठक आज दि. 10 डिसेंबर 12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
     या दौ-यात संबंधित विभागांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी गांभीर्यपूर्वक व चोखपणाने पार पाडावी तसेच त्यांच्या या दौ-यात कोणतीही कसुर राहू नये याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश श्री. मवारे यांनी या बैठकीत दिले. संबंधित विभागाच्या  अधिका-यांकडून सूचनाही ऐकून घेतल्या. तसेच विविध विभागांनी पार पाडावयाच्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली.
     या आढावा बैठकीसाठी पोलीस आयुक्त प्रदिप रासकर, पोलीस अधिक्षक राजेश प्रधान, महानगर पालिका आयुक्त अजय सावरीकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, अप्‍पर पोलीस अधिक्षक तुषार दोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल भडकुंबे, अश्विनी ग्रामीण हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. माधवी रायते,   डॉ. अशोक शिंदे, जेष्ठ नेते विष्णूपंत कोठे, प्रशांत परिचारक यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 
Top