नळदुर्ग -: येथील एस.के. जहागिरदार डेव्हलपर्सच्यावतीने आयोजित केलेल्या भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद येथील ए.के. आझाद क्रिकेट क्लबने पटकाविले आहे. तर लॉर्ड क्रिकेट क्लबने उपविजेतेपद मिळविले आहे.
एस.के. डेव्हलपर्सच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एकूण 40 संघ सहभागी झाली होते. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना दि. 9 डिसेंबर रोजी ए.के. आझाद क्रिकेट क्लब व लॉर्ड क्रिकेट क्बब यांच्यात झाला. यामध्ये ए.के. आझाद क्रिकेट क्लबने लॉर्ड क्रिकेट क्लबचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण 9 डिसेंबर रोजी पार पडले. या कार्यक्रमास प्रभारी नगराध्यक्ष शहबाज काझी, नगरसेवक संजय बताले, उस्मानाबादचे खलील शेख, अझहर जहागिरदार, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, विलास येडगे, एस.के. जहागिरदार डेव्हलपर्सचे सय्यद कौसर पाशा जहागिरदार आदीजण उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते 15 हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. तर उपविजयी संघास 5 हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी उत्कृष्ट खेळी करणा-या खेळाडूंनाही वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.