नळदुर्ग -: इंडिका कारची सायकलस्वारास समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सायकलस्वार ठार झाल्याची घटना सोमवार दि. 10 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरील बाभळगाव (ता. तुळजापूर) तलावानजीक घडली.
श्रीमंत सटवा बागडे (वय 59, रा. बाभळगाव, ता. तुळजापूर) असे अपघातात मरण पावलेल्या सायलकस्वाराचे नाव आहे. यातील श्रीमंत बागडे हे सायकलवरून आपल्या कामासाठी नळदुर्गकडे जात होते. बाभळगाव तलावानजीक आल्यानंतर त्यांना समोरून येणा-या इंडिया कार (क्र. एमएच 02 / टीझेड 6572) ने जोराची धडक दिली. या अपघातात श्रीमंत बागडे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तर इंडिका कार ही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळली. श्रीमंत बागडे यांना उपचारासाठी रूग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर इंडिका कारमधील एकही व्यक्ती जखमी झाला नसून कारचालकास नळदुर्ग पोलीसानी ताब्यात घेतले आहे. मयत श्रीमंत बागडे हे राष्ट्रीय महामार्ग क्र. नऊवर गॅगमन म्हणून काम करीत होते. या अपघाताची नळदुर्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार डी.जी. कदम हे करीत आहेत.