सोलापूर : सिमेवर लढणा-या सैनिकांमुळे आज आपण सगळे घरात सुखाने राहु शकतो. सैनिकांच्या बलीदानामुळे व त्यागामुळे आपला देश सुरक्षित आहे. सैनिकांच्या कुटुंबियांचे रक्षण करणे आपले नैतिक कर्तव्य असून ध्वजदिन निधी संकलनास सढळ हाताने मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशिय सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर जिल्हा परिषद सदस्या सीमा पाटील, ग्रुप कॅ. श्रीकांत कुलकर्णी, ले. कर्नल ए. गुलीया, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मवारे या वेळी पुढे म्हणाले की, ध्वजदिन निधी संकलनाचे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करण्यात येईल. यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागाने आपला सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. इतर अनेक शासकीय कामांसाठी आलेल्या सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने मदत केली पाहिजे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅ. सुनिल गोडबोले यांनी सन 2011-12 या वर्षीचे ध्वजदिन निधी उद्दिष्ट 79 लाख 50 हजार शंभर टक्के साध्य झाल्याचे सांगितले. तसेच शिक्षणासाठी किंवा अन्य अभ्यासक्रमांसाठी जिल्ह्यात शिक्षण घेणा-या सैनिकांच्या पाल्यांसाठी वसतीगृहासाठी प्राधान्याने प्रवेश दिला जाईल असेही सांगितले.
कार्यक्रमात ध्वजदिन निधी 2011-12 साठी उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालयांना व सैनिकांच्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास इतर वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिकांचे कुटुंबिय व नागरिक उपस्थित होते.