उस्मानाबाद -: उस्मानाबाद तालुक्यातील या वयोवृध्द महिलेचा आळंदी येथे मृत्यु झाला. आळंदीच्या इंद्रायणी घाट येथील दांडेकर पुतळ्याजवळ सदर महिला 4 डिसेंबर रोजी मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती आळंदी देवाची (जि. पुणे) पोलीस स्टेशनमार्फत उस्मानाबाद तहसील कार्यालयास कळविण्यात आल्याचे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
    या महिलेच्या कपाळावर गोंदलेले असून गळयात लालदोरा आहे. अंगावर पांढऱ्या रंगाची सहावार साडी व त्यावर पिवळया रंगाची ठिपके आहेत. पोपटी रंगाचा ब्लाऊज/दोन्ही हातात हिरव्या रंगाच्या काचेची 5/ 5 बांगडृया, डाव्या हाताच्या पोटरीवर तुळशीचे चित्र गोंदलेले, उंची 5 फुट 2 इंच, रंग-गोरा आहे. वरील नावाशी तसेच वर्णनाशी संबंधित असलेल्या महिलेच्या  नातेवाईकांनी आळंदी देवाची पोलीस स्टेशन  येथे (फोन नंबर 02135-232214) संपर्क साधावा, असे तहसीलदार, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.  
 
Top