नळदुर्ग :- समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या तत्त्वावर आधारीत भारतीय संविधानाची निर्मिती करुन देशात लोकशाही शासन प्रणाली प्रस्थापित करुन मानवी हक्कापासून वंचित असलेल्या उपेक्षिताना घटनात्मकदृष्टया मानवी हक्क मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उपेक्षिताना आत्मसन्मान मिळवून देणारे महामानव होत, असे प्रतिपादन रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड यांनी वागदरी (ता. तुळजापूर) येथे आयोजित अभिवादनपर कार्यक्रमात केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 56 व्या महापरिवर्तन दिनाच्या निमित्ताने वागदरी येथे अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एस.के. गायकवाड बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानवजातीला मानवी हक्काकरीता संघर्षासाठी व सर्वांगिण विकासाकरीता प्रेरणा देणारे आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व महान असून विश्ववंदनिय आहे. तेंव्हा त्यांचे विचार प्रत्येकानी आत्मसात करून प्रत्यक्षात आचरणात आणणे ही काळाजी गरज आहे.
प्रारंभी माजी ग्रामपंचायत सदस्या गेंदाबाई नागनाथ बनसोडे, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ताबाई गायकवाड यांच्या हस्ते येथील समाज मंदिरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन करुन बुध्दवंदना घेण्यात आली. यावेळी बुध्दभूषण वाधमारे, क्रांती वाघमारे आदी विद्यार्थ्यांनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केले. यावेळी बळीराम धाडवे, सोमा वाघमारे, कुंडलिक वाघमारे, कल्लाप्पा वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, संतोश झेंडारे, नुतन ग्रामपंचायत सदस्या कविता गायकवाड, महिला कार्यकर्त्या उज्वला वाघमारे, सुशिलाबाई वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
शेवटी महादेव वाघमारे यांच्या आभारप्रदर्शनानंतर उपस्थित जनसमुदायालनी दोन मिनीटे आपापल्या जागेवर शांतपणे उभे राहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.