तुळजापूर -: येथील सैनिक विद्यालयात दि. 9 डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र धनुविद्या संघटनेच्‍या अधिपत्‍याखाली आर्चरी असोसिएशन ऑफ उस्‍मानाबाद डिस्ट्रिक्‍ट यांच्‍यावतीने जिल्‍हास्‍तरीय धनुविद्या (तिरंदाजी) स्‍पर्धेची निवड चाचणी स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धेसाठी ही निवड चाचणी आयोजित केली आहे. या स्‍पर्धेची सुरूवात रविवारी दुपारी एक वाजता करण्‍यात येणार असून या स्‍पर्धेत सब ज्‍युनिअर गटातील मुले म मुली धनुर्धर (तिरंदाजी) यांच्‍यात इंडियन, रिकर्व्‍ह व कंपाऊड राऊन्‍डमध्‍ये घेण्‍यात येणार आहे. 
            या स्‍पर्धेसाठी जिल्‍ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय तालुका संघानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संघटनेचे अध्‍यक्ष आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे. या स्‍पर्धेच्‍या अधिक माहितीसाठी जिल्‍हा संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, तांत्रिक समिती प्रमुख अभय वाघोलीकर, स्‍पर्धा विभागप्रमुख गुणवंत काळे यांच्‍याकडे संपर्क साधण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
 
Top