बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: सन 2008 मधील अधिका-यांनी केलेल्या कारवाईत दोषी आढळलेल्या डॉ. गुलाब पाटील व डॉ. हेमंत साने यांना बार्शी कोर्टात दोषारोप पत्र कायम ठेवण्यात आले असून त्यांना एक महिन्याची कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
एप्रिल 2008 मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल बोपलकर यांनी डॉ. गुलाब माणिकराव पाटील (वय 45, श्रेयस हॉस्पिटल कुर्डूवाडी रोड) व डॉ. हेमंत साने (पांडे चौक) येथील साने हॉस्पिटल यांच्याकडे तपासणीकामी भेट दिली असता त्यांना कलम 4 (3) / 29 गर्भलिंग निदान प्रतिबंधक नियम कायदा भंग केल्याचे निदर्शनास आले त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केला.
यातील डॉ. पाटील हे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष होते तर डॉ. हेमंत साने हे मध्यवस्तीत असलेले डॉक्टर आहेत. बार्शी कोर्टात त्यांच्यावर खटला चालविण्यात आला यात साक्षी पुरावे तपासणी करुन गुन्हा सिध्द झाला. त्यावरुन प्रथम वर्ग दंडाधिकारी बार्शीचे न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंधात्मक कायदा 1996 चा कलम 23 अंतर्गत येणा-या नियमांचा भंग केल्याप्रकरणी एक महिन्याची साधी कैद व 5 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास आठ दिवसाची साधी कैदाची शिक्षा सुनावली.
याकामी डॉ. रेवाप्पा व तंगशेट्टी वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल बोपलकर यांनी सरकारी पक्षाच्या कामे पुरावे सादर केले व ते पुरावे ग्राह्य धरुन शिक्षा ठोठावण्यात आली. यात आरोपीतर्फे अॅड. पी.आर. करंजकर व सरकारतर्फे अॅड. सौ. बळी मॅडम यांनी काम पाहिले.