बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील भाग्‍यकांता सामाजिक सेवा प्रतिष्‍ठानच्‍यावतीने ज्‍येष्‍ठ किर्तन व प्रबोधनकार ह.भ.प. प्रभाकर (दादा) बोधले महाराज, सुप्रसिध्‍द शल्‍यकर्मी डॉ. विजयकुमार केसकर, सेवाव्रती विनय संघवी यांना जाहीर करण्‍यात आल्‍याची माहिती प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष मुरलीधर चव्‍हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.    
       या पुरस्‍काराचे वितरण स्‍त्रीमुक्‍ती चळवळीतील अग्रणी श्रीमती विद्या बाळ यांच्‍या हस्‍ते, माजी आमदार श्रीमती प्रभाताई झाडबुके यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व भारतीय जैन संघटनेचे माजी राज्‍याध्‍यक्ष ओमप्रकाश बाफणा यांच्‍या प्रमुख उपस्थितीत दि. 22 डिसेंबर रोजी मातृ‍मंदिर, ढगे मळा बार्शी येथे होणार आहे.
       यापूर्वी सामाजिक कार्यासाठी संदिपान गायकवाड, प्रभाकर डमरे, धनंजय मलंग, अध्‍यात्मिक कार्यासाठी दादा बुडूख, नंदू महाराज रणशूर, बाळासाहेब  जालनापूरकर महाराज, वैद्यकीय डॉ. प्रकाश बुरगुटे, डॉ. नाना सामनगावकर, डॉ. बी.वाय. यादव यांना भाग्‍यकांता पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले आहे.
     यावेळी बोलताना अध्‍यक्ष मुरलीधर चव्‍हाण म्‍हणाले, मागील चार वर्षापासून समाजोपयोगी उपक्रम, आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी संस्‍कार केंद्र चालविले असून यापुढे निःशुल्‍क वृध्‍दाश्रमाचा भावी प्रकल्‍पाचा संकल्‍प केला आहे. हा पुरस्‍कार समाजातील विविध क्षेत्रातील गुणीजनांना त्‍यांच्‍या निःस्‍पृह कार्याबद्दल देण्‍यात येतो. या कार्यक्रमासाठी बार्शीसह तालुक्‍यातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्‍थेच्‍या पदाधिका-यांनी केले आहे. यावेळी प्रतिष्‍ठानचे सचिव गिरीश केसकर, प्रकाश मांडे, भारत पाटील, बाबुराव धुमाळ, विकास पाटील, प्रा. अरूण नवले, प्रा. गोविंद ढाळे, आबासाहेब पाटील, अभय चव्‍हाण, अनंतराव देशमुख, विजय शिखरे, सचिन आपसिंगकर उपस्थित होते.
 
Top