सोलापूर :- रासायनिक खतावर देण्यात येणारे अनुदान सरळरित्या लाभार्थी शेतक-यांच्या बँक अकाउँटमध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थी शेतक-यांची कोअर बँक सुविधा असणा-या या बँकाँमध्ये बँक खाती उघडणे आवश्यक आहे. याची अंमलबजावणी सर्व लाभार्थी शेतक-यांना आधारकार्ड दिल्यानंतर व आधारकार्डाद्वारे बँक पेंमेंट सुविधा कार्यरत झाल्यानंतर सुरु करण्यात येणार आहे.
    या कार्यपध्दतीचा यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी खातेधारकांची 100 टक्के आधारकार्ड नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी यांनी केले आहे.
 
Top