उस्मानाबाद -: राज्य शासनाचा महिला व बाल विकास विभाग, राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन, युनिसेफ मुंबई यांच्यावतीने राज्यात राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून दि. 19 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी केले आहे