उस्मानाबाद -: टंचाईग्रस्त भागातील ज्या शेतक-यांच्या बहुवार्षिक फळबागा बाधीत झाल्या आहेत अशा शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाच्या व्याजदरावर सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून जिल्ह्यातील उस्मानाबाद,कळंब,उमरगा आणि भूम या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे. यासाठी संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधित राष्ट्रीयकृत बँक,विभागीय ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,राज्य शासनाच्या कृषी किंवा सहकार विभागाच्या बँकांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
        टंचाई परिस्थितीमध्ये टँकरव्दारे पाणी देणे, मलचिंग करणे, सेंद्रीय खताचा वापर करणे आदिंसाठी प्रती हेक्टर 30 हजार रुपयांप्रमाणे फळपिकाचा खर्च गृहीत धरण्यात आलेला आहे. व त्याच्या 90 टक्के पिक कर्ज जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी देण्यात येणार आहे. या योजनेची अंतीम मुदत 31 डिसेंबर असून अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
 
Top