सोलापूर -: जिल्हा वार्षिक योजना सन 2013-14 च्या सर्वसाधारण योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी जिल्ह्याला कमाल नियतव्यय रु. 238.61 कोटीची मर्यादा कळविण्यात आली होती. परंतू सध्या राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून तसेच चालू व पुढील वर्षामध्ये टंचाईच्या उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजनेतर खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पर्यायाने राज्याच्या उपलब्ध स्तोत्रावर अतिरिक्त भार पडणार असल्याने योजनांतर्गत खर्चामध्ये कपात करावी लागणार असल्याने सुधारित कमाल नियतव्यय मर्यादा रु. 226.68 कोटी देण्यात आलेली आहे असे जिल्हा नियोजन अधिकारी यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.