उस्मानाबाद -: केंद्र पुरस्कृत वैरण विकास योजनेअंतर्गत मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करणे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थींची निवड सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे. यासाठी सोमवार, दि.21 रोजी दुपारी 2 वाजता कुक्कुट प्रकल्प,उस्मानाबाद येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठीत समितीमार्फत ही निवड करण्यात येणार आहे. तरी या सोडतीव्दारे केल्या जाणा-या लाभार्थी निवड प्रक्रियेसाठी प्रस्ताव सादर केलेल्या लाभार्थींनी जास्तीत जास्त संख्येने हजर रहाववे,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस.एस. भोसले यांनी केले आहे.