उस्मानाबाद -: जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीबाबत अंतिम कार्यक्रम व आरक्षण निश्चितीबाबतच्या कार्यक्‌रमाची प्रत 18 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे.
         जिल्हा परिषद तसेच नगर परिषद यांच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडूकीसाठी नामनिर्देशनपत्र 22 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते  दुपारी 3 या  वेळेत (सार्वजनिक सुटीचा दिवस वगळून) अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अथवा सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवार अथवा त्यांच्या सूचकास देता येतील. ग्रामीण निर्वाचन क्षेत्र  मतदार संघासाठी उपजिल्हाधिकारी सी.व्ही. सुर्यवंशी आणि लहान नागरी निर्वाचन क्षेत्र मतदार संघासाठी एम. जी. मुल्ला यांच्याकडे नामनिर्देशनपत्र देता येतील. दि. 18 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरु झाली असून ती 22 जानेवारीपर्यंत दुपारी 3 पर्यंत सुरु राहील. यावेळेत नामनिर्देशनपत्राचे नमुने उपरोक्त्‍ठिकाणी व वेळी प्राप्त होतील.
                नामनिर्देशनपत्रांची छाननी महसूल भवन,तहसील कार्यालय,उस्मानाबाद येथे 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून होईल. उमेदवारी मागे घेण्याची तारीख 1 फेब्रूवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. आवश्यकता असल्यास 10 फेब्रुवारी रोजी  सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत मतदान घेण्यात येईल,असे कळविण्यात आले आहे.
                याबाबतची अधिक माहिती जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर पहावयास मिळेल.
 
Top