उस्मानाबाद -: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्यावतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी भक्तनिवासाचे बांधकाम तसेच बिगर निवासी इमारतीचे बांधकाम करण्यासंदर्भात निवीदा संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. सदर कामांबाबत http:// mahatenders.gov.in या संकेतस्थळावर या कामांबाबतच्या अटी व शर्ती याबाबतची संपूर्ण माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये परंडा तालुक्यातील भैरवनाथ मंदिर, सोनारी येथे गुरुगादी भक्त निवास बांधकाम आणि कल्याण स्वामी समाधीमंदिर डोमगांव येथे भक्तनिवास बांधकाम (ई-निवीदा क्र.24/ 2012-13), उमरगा तालुक्यातील श्रीविठठल रुख्मीनी मंदिर, सुंदरवाडी येथील भक्तनिवास बांधणे (ई-निवीदा क्र.23/ 2012-13) उस्मानाबाद तालुक्यतील पशुवैद्यकिय दवाखान्याच्या बिगर निवासी इमारतीचे बांधकाम (ई-निवीदा क्र.23/ 2012-13) आदि कामांचा समावेश आहे.पात्र ठेकेदारांनी ई-निविदा सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद,उसमानाबाद यांनी केले आहे.
 
Top