उस्मानाबाद -: सार्वजनीक गणेशोत्सवात कौटुंबीक हिसाचारापासुन महीलांचे संरक्षण, स्त्री भ्रुण हत्या, अनैतिक व्यवसाय व मानवी व्यापार प्रतिबंध,हुंडा प्रतिबंध,देवदासी प्रथा नाहीशी करणे,बालविवाह प्रतिबंध अशा विषयांच्या अनुषंगाने प्रचार, प्रसार होईल अशा प्रकारच्या सजावटी केलेल्या सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांना रक्कम महिला व बालविकास विभाग मार्फत  पाच हजार रुपयांचे पारितोषक देवून गौरविण्यात येणार  असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यु.पी. बिरादार यांनी कळविलेआहे.
       पारितोषीकाकरिता प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील  निवड समिती करणार आहे.   इच्छुक गणेशोत्सव मंडळांनी त्यांचा प्रस्ताव योग्य त्या कागदपत्रांसह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,प्रशासकीय इमारत, रुम.नं.15, तळमजला, उस्मानाबाद येथे दि.30 जानेवारीपर्यंत सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

 प्रिलीस्टबाबत सूचना

उस्मानाबाद -: उच्च माध्ययमिक इ. 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु. मार्च-2013 मध्ये पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रिलीस्टमध्ये कांही दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्त्याचे पत्र  दि. 22 जानेवारी रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला, उस्मानाबाद येथे मंडळाच्या प्रतिनिधीकडे देण्यात याव्यात,असे विभागीय सचिवांनी कळविले आहे. जिल्हयातील  सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी.         
 
Top