उस्मानाबाद -: माहे एप्रिल ते सप्टेंबर २०१३ या कालावधीत मुदती संपणा-या तुळजापूर तालुक्यातील येडोळा, आलियाबाद व रामतिर्थ या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाबाबत कोणास काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असल्यास त्यांनी दि. २३ जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील  ग्रामपंचायत निवडणूक शाखेत कार्यालयीन वेळेत समक्ष हरकती व सूचना दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
          वेळेत हरकती व सूचना प्राप्त न झाल्यास त्याचा विचार केला जाणारा नाही, याची नोंद घ्यावी.  शासकीय सुटया वगळून इतर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीच हरकती व सूचना स्वीकारल्या जातील.
 
Top