सोलापूर -: जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या मातांचे प्रशिक्षण शिबीर घेऊन त्यांना पोषण आहार व पोषण मुल्यांची माहिती करुन द्यावी अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केल्या.
    कुर्डुवाडी येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी आज जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, महिला व बालविकास सभापती जयमाला गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, महिला व बालकल्याण अधिकारी दिपक ढेपे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
    सर्व अधिका-यांना सूचना करताना प्रा.. गायकवाड म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून महिला व बालविकास विभागाच्या महत्वाच्या कामांसाठी निधी वापरावा. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बालविकास केंद्र सुरु ठेवण्याबाबत शासन निर्णय लवकरच घेण्यात येईल. अंगणवाड्यांचा शालेय पोषण आहार देताना त्या आहाराच्या गुणवत्तेकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. कुपोषित मुलांना त्यांच्या घरीही पोषण युक्त आहार मिळण्यासाठी त्यांच्या मातांना एक विशेष प्रशिक्षण शिबीर घेऊन पोषण आहाराचे महत्व पटवून द्यावे असेही त्या म्हणाल्या.
    अनाथ मुलांना सांभाळणा-या संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुचीत प्रकार घडू नयेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक जिल्ह्याला लवकरच संरक्षण अधिकारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     बैठकीत डॉ. माळी आणि जयमाला गायकवाड यांनी महिला व बाल विकास विभागातील विविध अडचणी मांडल्या.


महिला व बालविकास मंत्र्यांनी दिला बालकास पोलीओ डोस

सोलापूर -: राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिम दिनी महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्वहस्ते कुर्डुवाडी येथे पोलीओचा डोस बालकास पाजला. यावेळी त्यांनी नगरपरिषद कुर्डुवाडीच्या पोलीओ बुथची पाहणी केली. तसेच जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या पोलीओ बुथची माहिती घेतली.
      यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, महिला व बालविकास सभापती जयमाला गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, महिला व बालकल्याण अधिकारी दिपक ढेपे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. पराडकर उपस्थित होते.   
 
Top