उस्मानाबाद -: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन 2013-2014 या वर्षासाठी जे महिला बचत गट/ महिला मंडळे पुरक पोषण आहार पुरवठा करु इच्छितात त्यांनी तसेच सध्या शिजवुन पुरक पोषण आहार पुरवठा करत असलेले महिला बचत गट / महिला मंडळे यांनीही सध्या शिजवुन पुरक पोषण आहार करत असलेल्या अंगणवाडीसाठी सन 2013-14 साठी अर्ज करावेत. ज्या ठिकाणी महिला बचत गट/ महिला मंडळामार्फत पुरक पोषण आहार पुरवठा सुरु नाही. त्या ठिकाणीही संबधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामधून अर्ज घेण्यात यावेत व भरलेले अर्ज दिनांक 28 फेब्रुवारीपर्यंत संबधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.