उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, व कोकण (रत्नागिरी ) या नऊ विभागीय मंडळातील कनिष्ठ लिपिकाची रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात आली. त्यानंतर गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय यादी मंडळाच्या www.msbshse.ac.in. या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून पात्र उमेदवारांना कागदपत्राच्या पडताळणीसाठी दि. 21 ते 24 जानेवारी पर्यंत राज्यमंडळ कार्यालय, पुणे येथे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
कागदपत्र पडताळणीसाठी एसएमएसद्वारे पात्र उमेदवारांना कळविण्यात येत असून त्या अनुषगांने या उमेदवारांना पत्राद्वारेही सुचना पाठविण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी मंडळाच्या उपरोक्त संकेतस्थळावर भेट द्यावी, असे राज्य मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.