सोलापूर :- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत करमाळा येथे उपजिल्हा रुग्णालयात ७ जानेवारी रोजी सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजि करण्यात आले होते. या योजनेंतर्गत एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील व्यक्ती तसेच दारिद्र्यदेषेखालील अंत्योदय कार्डधारक, केशरी कार्डधारक एकुण ८९१ रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच त्यापैकी १६१ रुग्णांना पुढील उपचारासाठी व शास्त्रक्रियेसाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील या योजनेंतर्गत शासनाने अधिकृत केलेली १४ खाजगी व शासकीय रुग्णालये सहभागी झाली होती. या शिबीरास, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे डॉ. रमेश सोनवणे, एम.डी. इंडियाचे श्री. अरविंद व सर्व आरोग्य मित्र, सुपरवायझर उपस्थित होते.