नळदुर्ग -: सद्य परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा -हास होत असून सबंध मानवी जीवन धोक्यात येत आहे. त्याकरीता पर्यावरण संवध्रन करणे सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी महिला, युवकानी पुढाकार घेऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज झाली आहे, असे मत साहित्यिक भ.ना. कदम यांनी व्यक्त केले.
वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकार बायफ संस्था पुणे व परिवर्तन सामाजिक संस्था, नळदुर्ग यांच्यावतीने मुर्टा (ता. तुळजापूर) येथे जि.प.प्रा. शाळेत आयोजित राष्ट्रीय पर्यावरण जनजागृती अभियानात कदम हे मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मेघा बाळू कदम, ग्रा.पं. सदस्य जयसिंह गवळी, सुमन लाखे, सुनिता कुरदुंरे, युवक कार्यकर्ते गोपाळ सुरवसे आदीजण उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे, आधार सामाजिक संस्थेचे सचिव दयानंद काळुंके, ज्ञानकिरण संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलकंठ इटकरी तर आभार रविंद्र डावरे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.