नळदुर्ग -: वसुंधरा राज्‍यस्‍तरीय पाणलोट विकास यंत्रणा, एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन केंद्र यशदा पुणे व परिवर्तन सामाजिक संस्‍था, नळदुर्ग यांच्‍यावतीने नुकतेच शेतक-यांची पाणलोट क्षेत्राचा अभ्‍यास करण्‍यासाठी सहल संपन्‍न झाली.
    वडगाव लाख (ता. तुळजापूर) येथे टाटा सामाजिक विज्ञान संस्‍था, तुळजापूर यानी केलेल्‍या पाणलोट विकासाच्‍या कामाची पाहणी करण्‍यासाठी कळंब तालुक्‍यातील बरमाची वाडी व गौर या दोन गावातील प्रत्‍येकी 25 महिला व 25 पुरुष असे एकुण 100 लोकांची सहल संपन्‍न झाली. या गावात झालेल्‍या विकास कामाची माहिती पाणलोट समितीचे सचिव रावण सपकाळे यानी अतिशय सविस्‍तरपणे दिली. या सहिलीमध्‍ये बरमाची वाडी गावचे सरपंच पांडुरंग महाजन, सचिव संजय बोराडे, तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्षसह इतर शेतकरी, तसेच गौर गावचे पाणलोट समितीचे अध्‍यक्ष, सचिव, ग्रा.पं. सदस्‍य, तंटामुक्‍त समितीचे अध्‍यक्ष, बचत गटाच्‍या महिला मोठ्या संख्‍येची उपस्थित होत्‍या. या सहलीतून शेतक-यांना आपल्‍या गावात पाणलोटाचे काम कसे करावे, याची दिशा मिळाल्‍याचे पांडुरंग महाजन यांनी सांगितले.

 
Top