नळदुर्ग -: माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान व विज्ञानामुळे अपेक्षित सृष्टीबदल झाला, परंतु दुसरीकडे अनिष्ठ प्रथा व परंपरेच्या नावाखाली अंधश्रद्धा जोपासल्या जात आहे. ही बाब आजच्या विज्ञान युगात चिंताजनक असून सुयोग्य बदलासाठी पुढील काळात वैज्ञानिक दुष्टी निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत नळदुर्ग येथील परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी व्यक्त केले.
नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने केशेगाव (ता. तुळजापूर) येथे राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित युवक शिबिराप्रसंगी 'अंधश्रद्धा निर्मुलन व उपाय' या विषयावर बनसोडे हे वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.एस.एस. घोरपडे तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून प्रा. पांडुरंग पोळे, ज्ञानकिरण संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे, प्रा.डॉ. एस.बी. पाटील, प्रा.व्ही.व्ही. स्वामी हे होते. यावेळी पुढे बोलताना बनसोडके म्हणाले, पर्यावरणाचे महत्त्व व संवर्धनासाठी यवुकांची भूमिका याचे महत्व सांगितले. शिवाय अंधश्रद्धा समज गैरसमज यावर प्रा. पोळे यांनी तर गावविकासात ग्रामसभेचे महत्त्व या विषयावर भैरवनाथ कानडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. के.ई. कलकोटे, प्रा.डॉ.पी.एस. गायकवाड, प्रा.बी.व्ही. सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. गायकवाड यांनी तर संत्रसंचालन प्रा. तुळशिराम दबडे यांनी केले. शेवटी प्रा. संतोष पवार यांनी आभार मानले.