नवी दिल्ली -: दिल्लीतील सामूहिक बलात्कारात बळी पडलेल्या 'दामिनी'च्या वडिलांनी आध्यात्मिक संत आसारामबापू यांना 'सैतान' असे म्हटले आहे.
आसाराम बापू यांनी दिल्लीतील सामूहिक बलात्काराला पीडित तरुणीला दोषी धरले होते. त्यामुळे चिडलेल्या दामिनीच्या वडिलांनी आसारामबापूंना 'निराशाराम बापू' म्हटले आहे. आसाराम बापूंच्या वक्तव्याचा कडक शब्दांत निषेध व्यक्त करताना दामिनीच्या वडिलांनी, आसाराम बापू संत नाही तर संतांच्या भगव्या वेषातील सैतानच आहे. ज्याला लोककल्याणाचे काहीही देणे-घेणे नाही.
आपली मुलगी गमाविल्यामुळे प्रचंड दु:खात बुडालेल्या दामिनीच्या वडिलांनी बापूंच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल करणार आहे. आसाराम बापूवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल असून, या खटल्यामुळे त्या खटल्यांना अधिक बळकटी येईल, असेही दामिनीच्या वडिलांनी म्हटले आहे.

* सौजन्य दिव्यमराठी