बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील सदगुरू प्रभाकर बोधले महाराज भक्‍त मंडळ व श्री गुरू सेवा मंडळाच्‍यावतीने उत्रेश्वर मंदिरात आयोजित केलेल्‍या अखंड हरिनाम सप्‍ताहात यावर्षी ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांच्‍या किर्तन सप्‍ताहाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    हरिनाम सप्‍ताहाचे हे चौदावे वर्ष असून रविवार दि. १३ ते शनिवार दि. १९ पर्यंत दररोज ५ ते ६ या वळेते ह.भ.प. गुरूवय प्रभाकर (दादा) बोधले महाराज यांचे प्रवचन होत असून ६ ते ८ पर्यंत ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांचे किर्तन सुरू करण्‍यात आले आहे. या व्‍यतिरिक्‍त दैनंदिन हरिपाठ, काकड आरती, भजन आदि धार्मिक कार्यक्रम देखील दररोज सुरू आहेत.
 
किर्तनमाला भाग - 1

        किर्तन कशा पध्‍दतीने असायला हवे याला वारकारी सांप्रदायाने नियम घालून दिले आहेत. पहिल्‍या दिवशी कोणत्‍या अभंगावर किर्तन असावे, दुस-या दिवशी कोणत्‍या तसेच त्‍यात कोणत्‍या विषयाला महत्‍त्‍व द्यावे, तसेच बंधनासारखे अलिखित नियम आहेत. पहिल्‍या दिवशीच्‍या किर्तनात देवाच्‍या रूपाचे वर्णन यानंतर गुण, ऐश्‍वर्य, शक्‍ती व प्राप्‍त करुन घेणा-या संत आणि सदगुरूंचे, काल्‍याचे, मानवीपर इत्‍यादी नियमाने बांधली किर्तन असते. कोणीही उठा अन काहीही अन कधीही कशाला वारकरी संप्रादाय मान्‍यता देत नाही. भक्‍ती, ज्ञान, वैराग्‍य सोडून यात काही नाही. प्रपंचाचा विरह होण्‍यासाठी वर्णनाचा विचार येथे येतो. वर्णन म्‍हणजे स्‍तुती, आपली स्‍तुती कोणाला आवडत नाही काय, आपली स्‍तुती अनेकांना फारच प्रिय असते. तात्‍वीक विचारात वेगळे आहे. मराठी भाषेत शब्‍दाचे अनुभव, अनेक गमतीजमतीने पहायला मिळतात. स्‍तुती ही व्‍याकरणाच्‍या दृष्‍टीने स्‍त्रीलिंगी, स्‍तुती नावाच्‍या स्‍त्रीचे आजपर्यंत लग्‍नच झाले नाही, ही अद्यापही कुंवारीच आहे, याला कारण काय का झाल नाही या स्‍तुतीचे लग्‍न तर तिला अपेक्षित वर मिळाला नाही. वरांची कमी नाही पण या ठिकाणी उदाहरण देताना स्‍तुती ही दुर्जनांना आवडते पसंत आहे. पण स्‍तुतीला दुर्जन आवउत नाही. त्‍यामुळे आणि सज्‍जनांना स्‍तुती आवडत नाही. स्‍तुतीला सज्‍जन आवडतात. त्‍यामुळे आजही ही स्‍तुती कुंवारीच राहिली आहे. ज्ञानोबांनी म्‍हटले आहे, स्‍वकिर्ती कानी न ऐकावी, स्‍वपूज्‍यता न डोळा देखावी, महाभारतातील उदाहरण देताना स्‍वस्‍तुती ही आपण आपलाच वध केल्‍यासारखे आहे. महाभारतातील उदाहरण देताना त्‍यांनी गौरव आणि पांडवांच्‍या युध्‍दाच्‍या प्रसंगी धर्मासमोर कर्ण आल्‍यावर धर्माला युध्‍द करणे कठीण वाटू लागले. तो घायाळ झाला व आपल्‍या भावांना हाका मारू लागला. श्रीकृष्‍णालाही खूप हाका मारल्‍या, परंतु कोणीही लक्ष देत नसल्‍याने शेवटी त्‍याने युध्‍दाच्‍या रणांगणातून पळ काढत आपल्‍या तंबूत परतला. घायाळ झालेल्‍या धर्माला पाहून सर्व भाऊ व श्री कृष्‍ण त्‍याला विचारणा करु लागले. कोणी केले, हे काय झाले. त्‍यावेळी धर्मराजा खूप चिडलेला होतो. मी अगोदर मोठमोठ्याने हाका मारुन टाहो फोत असताना लक्ष दिले नाही आणि आता विचारायला आलात? चिडून त्‍याने सर्व भावांना अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली व त्‍यानंतर त्‍याने अर्जुनाचा धनुष्‍य असलेल्‍या गांडीवाच्‍याबाबत अपशब्‍द वापरले. त्‍यावेळी अर्जून त्‍याच्‍या अंगावर धावून गेला व त्‍याचा जीवघेण्‍याच्‍या दृष्‍टीने पुढे आल्‍यावर श्रीकृष्‍णाने मध्‍ये येत भांडणे सोडविली. यावेळी अर्जुनाने त्‍याने घेतलेल्‍या शपथेची आठवण केली व मला काही बोलले तरी चालेल परंतु माझ्या गांडीव धनुष्‍याच्‍या बाबत काही बोलले तर त्‍याचा जीव घेईल, अशी प्रतिज्ञा केल्‍याचे सांगितले. यावेळी श्रीकृष्‍णाने थोरल्‍या भावाला अपमानीत करण्‍याचा सल्‍ला दिला व सांगितले की, थोरल्‍या भावाला अपमानीत केले म्‍हणजे त्‍याला जीवंत मारल्‍यासारखेच असते. यानंतर त्‍याने दुसरी केलेली प्रतिज्ञा सांगितली, मला काही बोलले तरी चालेल परंतु माझ्या थोरल्‍या भावाला कोणी काही अपशब्‍द बोलल्‍यास त्‍याचा मी वध करणार, अशी प्रतिज्ञा केली असल्‍याचे सांगितले. यानंतर अडचण झाल्‍यावर श्रीकृष्‍णाने पुन्‍हा मधला मार्ग सांगितला, स्‍वतःची स्‍तुती कर, स्‍वतःची स्‍तुती म्‍हणजे स्‍वतःचा वध केल्‍यासारखेच आहे.
    संपूर्ण जगताचा कारण परमात्‍मा आहे. कारणामध्‍ये नैमित्‍तीक अन् उपाधान असे दोन प्रकार आहेत. ज्‍याच्‍या शिवाय कार्य होतच नाही. त्‍याला उपाधान तर जे कारण होण्‍याकरीता सहकार्य करतो त्‍याला नैमित्‍तीक म्‍हणतात. याचे उदाहरण देताना, कुंभार आणि माती याचे उदाहरण दिले. यात कुंभार हा मडके बनवितो, यात माती ही उपाधान आहे ती मडक्‍यात समाविष्‍ट आहे व ज्‍याच्‍याशिवाय मडके बनूच शकत नाही, म्‍हणून त्‍याला उपाधान म्‍हणावे. तर मडके बनवूनही कुंभार हा मडक्‍यापासून वेगळा आहे, त्‍याला नैमित्‍तीक म्‍हणावे. जगताच्‍या बाबतही परमात्‍मा हा उपाधान कारण आहे तर माया ही नैमित्‍तीक आहे.
    जगताच्‍या बाबत अजातवादाचे उदाहरण देताना प्रपंच झालाच नाही याला अजातवाद म्‍हणतात. जे झालंच नाही त्‍याच्‍यावर भांडणे म्‍हणजेच अजातवाद होय. याचे उदाहरण देताना घरात पाहुणे आले होते व नव-याने बायकोला पाहुण्‍यांसाठी चहा करायला सांगितले. यावेळी बायकोने मोठ्या आवाजात दूध आणायचे कळत नाही का असे म्‍हणाली. या गोष्‍टीचा नव-याला राग आला त्‍याने बाजारातून म्‍हैस आणता असे म्‍हणाला. यानंतर बायकोने कुंभाराकडून दोनचार मडकीपण आणायला सांगितले. ते कशाला म्‍हणून विचारल्‍यावर माझी आई, बहीण इत्‍यादी नातलगांना दूध, दही इत्‍यादी देण्‍यास लागतील, असे म्‍हटल्‍यावर नव-याने बायकोला मारायला सुरुवात केली. शेजा-यांनी भांडणे सोडविली व काय झाले, याची विचारणा केली. यात त्‍यांनी म्‍हैस आहे का, कुठे आहे, म्‍हैस जे नाहीच, त्‍याच्‍याबद्दल भांडणे म्‍हणजेच अज्ञातवाद होय असे म्‍हटले.
    अधिष्‍ठान हे परमात्‍मा आहे व याठिकाणी जगताचे वर्णन चालत नाही. जीवाने जीवाचे वर्णन करु नये, सुख‍ मिळेल म्‍हणून संसाराचे वर्णन करु नये. सोनेरी हरिण नव्‍हते, परंतु त्‍यामुळेच सीतेलचा दुःखाचा सामना करावा लागला. अपूर्णाने अपूर्णाकडे गेल्‍यावर दुःख प्राप्‍त होते. सर्वत्र एक असलेल्‍या परमात्‍म्‍याची स्‍तुती करावी. देव हा सर्व अवतारात बोलावल्‍याशिवाय येत नाही. जो बोलावल्‍याशिवाय येत नाही. त्‍याला देव म्‍हणतात. देवाला पितांबरच का याची अनेक उदाहरण दिली. ध्‍यान, समाधान काय हे उद्याच्‍या किर्तनात.....
    
 
Top