नळदुर्ग -: येथील आपलं घर नळदुर्ग संचलित डॉ. शरद पिशवीकर विज्ञान शाळेच्‍यावतीने तालुका स्‍तरीय शालेय विद्यार्थ्‍यांसाठी विविध स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेचे उदघाटन जेऊरकर यारंच्‍या हस्‍ते झाले. तर सुलभाताई पिशवीकर, पुष्‍पाताई आगरकर, दत्‍ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्‍पर्धेमध्‍ये एकूण १५ शाळेच्‍या २१० विद्यार्थ्‍यांनी सहभाग नोंदविला होता. सर्व विजेत्‍या स्‍पर्धकांना रोख रक्‍कम, पुस्‍तके व प्रशस्‍तीपत्र देऊन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. सदर स्‍पर्धाचे प्रशिक्षक म्‍हणून सुलभा चौधर, प्रा. ढवळे, प्रा. पोळे, प्रा. पवार, कोरेकर आदीनी केले. स्‍पर्धा यशस्‍वी करण्‍यासाठी आपलं घरचे व्‍यवस्‍थापक शिवाजी पोतदार, माणिक कोकणे, शिवराज सुर्यवंशी, सुनिल पुजारी, संगिता शहा यांनी परिश्रम घेतले.
 
Top