मुंबई :- राज्यस्तरीय उद्योग मित्र समितीची बैठक ६ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता वालचंद हिराचंद सभागृह, ४ था मजला, आय.एम.सी. बिल्डींग, आय.एम.सी.मार्ग, चर्चगेट येथे विकास आयुक्त (उद्योग) तथा अध्यक्ष, उद्योग मित्र यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
    राज्यस्तरीय उद्योग मित्र समितीची सप्टेंबर २०१२ मध्ये आयोजित करण्यात आलेली बैठक काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. राज्यस्तरीय महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शासनाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित रहाणार असून उद्योग संघटनांनी यापूर्वी पाठविलेले विषय विषयसूचीवर कायम ठेवण्यात आले आहेत.
      अधिक माहितीसाठी सुनिल महाजन, निमंत्रक उद्योग मित्र समिती,उद्योग संचालनालय, दुसरा मजला, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई- ४०० ०३२ यांचेशी (दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०२६७५५ किंवा फॅक्स क्र. ०२२-२२०२६८२६. email diumitra@maharashtra.gov.in) किंवा वा.दौ. देसले, उद्योग उपसंचालक (उद्योग मित्र) यांच्याशी दूरध्वनी क्र. ०२२-२२०४४१०७ वर संपर्क साधावा, असे विकास आयुक्त (उद्योग) तथा अध्यक्ष, उद्योगमित्र यांनी कळविले आहे.
 
Top