उस्मानाबाद -: कळंब व वाशी तालुक्यातील पाणीटंचाई व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तालुकास्तरीय आढावा बैठक दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शुभमंगल (बलाई) मंगल कार्यालय, तांदुळवाडी रोड, कळंब येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस आमदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व सरपंच, कार्यालयप्रमुख, जि.प. व पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, तलाठी हजर राहणार असून नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती, पं.स.कळंब, तहसिलदार, आणि गटविकास अधिकारी, पं. स. कळंब यांनी केले आहे.